
विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात घडामोडींना मोठा वेग आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून मुक्काम हालवला असून त्यांनी गुजरातमध्ये आश्रय घेतला असल्याचे समोर आले आहे. ते आज पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समोर आल आहे. (Sanjay Raut on Political Crisis in Maharashtra)
यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. तर त्या वेळी बोलताना राऊत म्हणाले की, सेनेचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. मात्र शिंदे आणि सेनेमध्ये काय बोलणं झालं आहे ते अध्याप समोर आलेलं नाहीये. महाष्ट्रात मध्यप्रदेश सारखा पॅटर्न चालणार नाही असंही यावेळी राऊत म्हणाले.
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत देखील आमचा संपर्क सुरु आहे. स्वत:ला किंगमेकर समजणाऱ्या सरकार आम्हाला कमजोर करू शकणार नाही. आमच्या आमदारांना गुजरामध्ये अडकवून ठेवले आहे, आमचे शिवसैनिक निष्ठावंत आहेत ते आमच्या कडे परत येतील अस राऊत पुढे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.