आता बर्ड फ्लू ची भिती घालवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

नागरिकांच्या  मनातील  बर्ड  फ्लू  विषयी असणारी  भिती  घालवण्यासाठी  रायगड  मधील  पेणमध्ये  शेतकरी  योध्दा  या कुक्कुटपालन  सहकारी  संस्थेच्या  वतीने  पेण  नगरपरिषद  मैदानावरती  चक्क चिकन  मोहत्सवाचे  आयोजन करण्यात  आले  आहे.

 रायगड : राज्यात  बर्ड  फ्लू  च्या  भितीने  खवय्यांनी  चिकन  खाण्याचे  सोडून  दिले असताना  चिकन  व्यवस्थीत  शिजवून  खाल्ल्यास  कोणत्याही  प्रकारचा  धोका नसल्याचे  सांगण्यात  येत  आहे. नागरिकांच्या  मनातील  बर्ड  फ्लू  विषयी असणारी  भिती  घालवण्यासाठी  रायगड  मधील  पेणमध्ये  शेतकरी  योध्दा  या कुक्कुटपालन  सहकारी  संस्थेच्या  वतीने  पेण  नगरपरिषद  मैदानावरती  चक्क चिकन  मोहत्सवाचे  आयोजन करण्यात  आले  आहे.

सायंकाळी  7  ते  9  या कालावधीत  पार  पडणाऱ्या  चिकन  मोहत्सवात  चिकन  लेगपीस, चिकन लॉलीपॉप, चिकन  बिर्याणी, आणि  अंड्याच्या  पदार्थांचा  समावोश  असणार आहे. दरम्यान  महोत्सवामध्ये  कोरोनाचे  निर्बंध  पाळण्यात  येत  आहेत. या महोत्सवातील  निमंत्रित  पाहुण्यांना  बॉयलर  कोंबडीचे  पदार्थ  मोफत  देण्यात येणार  आहेत.

चिकनचे  पदार्थ  खाल्ल्यानंतर  लोकांच्या  मनातील  बर्ड फ्लू  विषयी  असणारी  भिती  घालवण्यासाठी  आणि  चिकनच्या  व्यवसायाला तेजी  मिळवून  देण्यासाठी  या  मोहत्सवाचे  आयोजन  करण्यात  आल्याचे शेतकरी  योध्दा  कुक्कूटपालन  सहकारी  संस्थेच्या  अनिल  खामकर  यांनी सांगितले  आहे..

संबंधित बातम्या