आता अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी करावे लागणार 'या' नियमांचे पालन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाची वेळ आता पुन्हा बदलली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाचा विचार करता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर: कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाची वेळ आता पुन्हा बदलली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाचा विचार करता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या समितीने ठरवल्याप्रमाणे सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत भाविकांना अंबाबाई देवीचे दर्शन घेता येणार आहे. अंबाबाई देवीचे मंदिर  दर्शनासाठी रोजच खुले राहणार आहे. शुक्रवार पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

दरम्यान, यापुर्वी सकाळी सात ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले होते. या नवीन नियमांची अंमलबजावणी अंबाबाई देवीच्या मंदिराबरोबरच शहरातील ओढ्यावरील सिध्दीविनायक, आझाद चौकातील दत्त भिक्षालिंग मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, पंचमुखी मारूती मंदिर, टेंबलाई मंदिर, कात्यायनी मंदिर या मंदिरातही होणार आहे.

त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करताना आणि देवदर्शन घेतांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे त्रिसुत्री नियम पाळावे लागणार, असे न केल्यास मंदिरात प्रवेश दिल्या जाणार नाही. त्याचबरोबर सायंकाळी सहानंतर या मंदिरांमध्ये कुणीही गर्दी करू नये, असे आवाहनही समितीने केले आहे.

राज्य सरकारने शरद पवारांची दिशाभूल केली; फडणवीसांचा दावा 

संबंधित बातम्या