महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या झाली - देवेंद्र फडणवीस

''ओबीसी आरक्षण न मिळण्यास जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्या''
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसDainik Gomantak

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्यायला परवानगी मिळाली नाही. यामूळे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली आहे. (OBC reservation killed in Maharashtra - Devendra Fadnavis )

देवेंद्र फडणवीस
नातवाच्या पसंतीला आजीने दिला नकार म्हणून काढला आजीचाच काटा

त्यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वर्षभर केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. त्यानंतर कमिशन तयार केलं पण त्याला पैसे दिले नाहीत. तसेच सर्वोच्च न्यायालयात थातूर-मातूर अहवाल सादर करत स्वत:चं हसू करून घेतलं. संबंधित अहवालावर सही नव्हती, तारीख नव्हती आणि डेटाही नव्हता. असा ही आऱोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशबाबतही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत निकाल दिला होता. पण मध्य प्रदेश सरकारने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी समर्पित कमिशन तयार केलं. त्याच्या माध्यमातून मध्य प्रदेशात जिल्हानिहाय प्रत्येक स्थानिक प्रशासनामार्फत डेटा तयार केला. म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली.’ असंही ते म्हणाले.

“आपल्याकडे मात्र केवळ राजकारण झालं. मंत्री भाषण करत राहिले, मोर्चे काढत राहिले, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये कोणतंही लक्ष घातलं नाही. त्यामुळे आज मध्य प्रदेशला परवानगी मिळाली आणि महाराष्ट्राचा अजूनही एम्पेरिकल डेटा तयार झालेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, सरकारमधील जे जबाबदार असतील त्यांनी राजीनामाच द्यायला हवा,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस
Indian Railways: महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या 'या' ट्रेनमध्ये केले बदल

मध्य प्रदेश ओबीसी निकालाचं महाविकास आघाडीकडून कौतुक

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाबाबत दिलेल्या निकालाचं महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून कौतुक करण्यात आलं. तसेच मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रालाही न्याय मिळेल आणि आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com