OBCvsOBC: नागपूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची घडी बसणार का?

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व राज्यात त्याबाबतचा कार्यक्रम जारी केला आहे.
OBCvsOBC: नागपूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची घडी बसणार का?
Nagpur ZP Dainik Gomantak

नागपूर: राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission)सर्व राज्यभरात जिल्हा परिषद (Zilla Parishad)आणि पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti)होणाऱ्या निवडणुकी (Election)बाबतचा कार्यक्रम जाहीर केला. नागपुरात विशेष बाब म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींच्या जागेवर ओबीसींचाच उमेदवार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात सर्वत्र ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक होण्याचे चिन्हे दिसत आहेत. मात्र ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक झाली तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीला मोठा ताण येईल.

राज्य निवडणूक आयोगाने नागपूर, अकोला, वाशीम, नंदूरबार आणि धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांवरही पोट निवडणूक होणार आहेत. यामध्ये ओबासी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे. परंतु काँग्रेस आणि भाजपने ओबीसी उमेदवार देण्याच्या घोषणा केली. त्यानंतर आता मात्र या निवडणूका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होण्याची मोठी शक्यता आहे.

Nagpur ZP
OBC Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व पक्षीय बैठक

राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह अकोला, वाशीम, नंदूरबार आणि धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांवरही पोटणीवडणूक होणार आहे. ओबासी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे. पण काँग्रेस आणि भाजपने (BJP)ओबीसी उमेदवार देण्याच्या घोषणा केल्याने ही निवडणूक ओबीसी विरुद्ध ओबीसी होण्याची दाट शक्यता आहे.

नागपुरात ओबीसीची नाराजी :

ओबीसी आरक्षण संपुष्टात आले होते. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसीच्या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. परंतु भाजप आणि काँग्रेसने या जागांवर ओबीसीच च उमेदवार देण्याची मोठी घोषणा केली. ही पोटनिवडणूक ओबीसी विरुद्ध ओबीसीच होईल.

यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपा कडून विधानसभेची तिकीट नाकारण्यात अली होती. त्यानंतर विधानपरिषदेवर त्यांना पाठवून बावनकुळेंचे पुनर्वसनही करण्यात आलेले नाही. आणि यामुळे ओबीसी समाज भाजपवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका भाजपला बसेल असे जाणकारांनाकडून सांगण्यात येत आहे.

Nagpur ZP
OBC आरक्षणाबाबत मोदींचा मोठा डाव

या जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणूका : तालुकानिहाय जिल्हा – परिषद सर्कल

नरखेड- सावरगाव, भिष्णूर

काटोल- येनवा, पारडसिंगा

सावनेर- वाकोडी, केळवद

पारशिवनी- करंभाड

रामटेक- बोथिया

मौदा- अरोली

कामठी- गुमथळा, वडोदा

नागपूर- गोधनी रेल्वे

हिंगणा- निलडोह,

डिगडोह- इसासनी

कुही- राजोला

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com