टोलवरून वाद, कॅब चालकाने आमदाराला धमकावत मधेच उतरवले

"मी आमदार आहे त्यामुळे मला टोल भरावा लागत नाही. मी सांगतो त्या रस्त्याने चल," असे आमदार कॅब चालकाला सांगत होते.
Toll Plaza|NCP MLA Raju Karemore
Toll Plaza|NCP MLA Raju KaremoreDainik Gomantak

Ola cab driver was arrested for allegedly abusing and threatening NCP MLA Raju Karemore from the cab during the journey:

एका ३८ वर्षीय ओला कॅब ड्रायव्हरला, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांना प्रवासादरम्यान शिवीगाळ आणि धमकी देत कॅबमधून बाहेर काढल्याबद्दल अटक करण्यात आली.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील आमदारा कारेमोरे यांच्या तक्रारीवरून आरोपी इरफान अलीला त्याच्या मानखुर्द येथील घरातून ताब्यात घेण्यात आले.

कारेमोरे यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आकाशवाणी आमदार निवास येथे जाण्यासाठी कॅब बुक केली होती. यावेळी टोलवरुन आमदार कारेमोर आणि कॅब चालकामध्ये बाचाबाची झाली.

Toll Plaza|NCP MLA Raju Karemore
Viral Video: विधवा असल्याने की मद्यपानामुळे? पन्ना राजघराण्याच्या महाराणीला मंदिराबाहेर काढल्यामुळे वादंग

“वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल भरण्यावरून त्यांच्यात वाद वाढल्यानंतर कॅबी चालकाने कारेमोरे यांना धमकी दिली. सकाळी 8.45 च्या सुमारास वाकोला जंक्शनवर पोहोचल्यावर धमकी देत कारेमोरे यांना कॅबमधून खाली उतरण्यास भाग पाडले,” असे पोलिसांनी सांगितले.

Toll Plaza|NCP MLA Raju Karemore
Watch Video: आंध्र प्रदेशात मध्यरात्री रंगलं अटकनाट्य, माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू सीआयडीकडून ताब्यात

सी लिंक टोल प्लाझावर आमदार कारेमोरे आणि कॅब चालकामध्ये बाचाबाची झाली. आमदार कारेमोर चालकाला म्हणाले की, "मी आमदार आहे त्यामुळे मला टोल भरावा लागत नाही. मी सांगतो त्या रस्त्याने चल."

"पण मी सांगतोय त्या रस्त्याने गेल्यास टोल भरावा लागेल यामुळे हेकेखोर चालकाने माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. तसेत मला धमकावत वाकोला जंक्शनवर कॅबमधून बाहेर काढले. यानंतर मी ओलाकडे तक्रार केली आणि नंतर दुसरी कॅब बुक केली,” असे कारेमोरे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com