Mumbai: इमारतींना सील करण्यासाठी नवी नियमावली 'जाहीर'

आजपासून BMC चे नवे मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत.
Mumbai: इमारतींना सील करण्यासाठी नवी नियमावली जाहीर'

Mumbai: इमारतींना सील करण्यासाठी नवी नियमावली जाहीर'

Dainik Gomantak 

देशात ओमिक्रॉनचा (Omicron) वाढता प्रभाव लक्षात घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील इमारती सील करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. ही मार्गदर्शकतत्वे आजपासून लागू होणार आहेत.

गेल्या काही दिवसांत मुंबई (Mumbai) शहरात ओमिक्रॉनच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. यामुळे 1 मार्च 2021 रोजी इमारती सीलबंद करण्यासाठी मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यात आली होती. पण आता बीएमसीने (BMC) नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

<div class="paragraphs"><p>Mumbai: इमारतींना सील करण्यासाठी नवी नियमावली जाहीर'</p></div>
Corona positive: बारामतीच्या बालेकिल्यावर कोरोनाचा शिरकाव

BMCच्या नवे गाईडलाईन्स

* इमारत आणि विंगमधील फ्लॅटच्या 20 टक्क्यहून अधिक व्यापलेल्या फ्लॅटमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत किंवा एक विंग सील केली जाईल.

*BMC ने पुढे सूचित केले आहे की रुग्ण आणि संपर्कात आलेले लोक क्वारंटाईनमध्ये असतांना स्वच्छता शिष्टाचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

* रुग्णाला लक्षणे आढळून आल्यास किमान 10 दिवस वेगळे ठेवले पाहिजे.

* बीएमसीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उच्च-जोखीम असलेलल्या सात दिवासाठी होम क्वारंटाईन केले जाईल.

* 5 व्या ते 7 व्या दिवशी चाचणी करणे किंवा चाचणी परिणामांच्या आधारावर लक्षणे दिसून आल्यास मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.

* दरम्यान भारतातील ओमिक्रॉनसंख्या 37,379 नवीन प्रकरांसह 3,49, 60, 261 वर पोहोचली आहे, तर सक्रिय प्रकरणे 1,71,830

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये 12,160 नवीन ओमिक्रॉनची प्रकरणे आणि 11 मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी माहिती दिली आहे.भारतातील ओमिक्रॉनची संख्या 37,379 नवीन प्रकरणांसह 3,49,60,261 वर पोहोचली आहे , तर सक्रिय प्रकरणे 1,71,830 एवढी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com