बनावट ई-पास देणारा भामटा गजाआड

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांच्या क्‍यूआर कोडमध्ये फेरफार

मुंबई

मूळ गावांकडे निघालेल्या परप्रांतीयांना बनावट ई-पास देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. या ठकाने मुंबई, नवी मुंबई, पालघर पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांच्या क्‍यूआर कोडमध्ये फेरफार केल्याची महिती परिमंडळ-1चे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली.
मनोज हुंबे असे अटक आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशांत लॉकडाऊन आहे. या काळात लांबच्या प्रवासासाठी संबंधित शहर अथवा जिल्हा पोलिसांकडून ई-पास घेणे बंधनकारक आहे. एक भामटा मोबाईल क्रमांकावरून 5000 रुपयांना बनावट ई-पास विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करून मनोज हुंबे याला चेंबूर येथून अटक केली.
मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या ऑनलाईन क्‍यूआरकोडमध्ये फेरफार करून तो बनावट पासची प्रत्येकी 5000 रुपयांना विक्री करत होता. या प्रकरणी त्याला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या