मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

मुंबई गोवा महामार्गावर काल भिषण अपघात झाला या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. मुंबई-गोवा मार्गावरील मोरवंडे फाटा नजीक दुचाकी आणि मोटारीचा अपघातात झाला.

खेड (रत्नागिरी) : मुंबई गोवा महामार्गावर काल भिषण अपघात झाला या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. मुंबई-गोवा मार्गावरील मोरवंडे फाटा नजीक दुचाकी आणि मोटारीचा अपघातात झाला. या अपघाता एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल मंगळवारी (ता. 23) दुपारी एकच्या सुमारास झाला आहे. टाटा सुमो आणि दुचाकी एकमेकांसमोर धडकून हा भीषण अपघात झाला आहे. 

या अपघातातबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी गंगाराम आखाडे वय वर्ष 43 हे तिसंगी आखाडेवाडी गावचे रहिवासी होते. या अपघातात आखाडे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पाठीमागे बसलेले नरेंद्र किशोर शिरकर कळंबट- सुतारवाडी, ता. चिपळूण येथिल होते. शिरकर संध्या गंभीर जखमी झाले असून बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्यावर लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान पुढील उपचारासाठी त्यांना चिपळूण येथिल रूग्णालयात हलवण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करत असतांना समोरून चिपळूण ते मुंबईच्या दिशेने येणार्‍या सुमोला या मोटरसायकल ने धडक दिली. (एमएच-01-बीटी-0817) (एमएच-08-एजे-3479) असे या अपघातातील गाड्यांचे नंबर आहेत. या भिषण अपघातात संभाजी आखाडे जागीच ठार झाले, तर नरेंद्र शिरकर हे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक 

संबंधित बातम्या