मुंबईतील एक लाख घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत

Mumbai
Mumbai

मुंबई

कोरोना महामारीमुळे बांधकाम व्यवसायावर संकट कोसळले असताना मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे एक लाख घरे खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात दोन वर्षांत आणखी दोन लाख 10 हजार घरांची भर पडणार आहे. लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीमुळे मोठे संकट आल्याचे नरॉक प्रॉपर्टीज या संस्थेने म्हटले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात 2013 नंतर सुरू झालेले आणि पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम कोरोनामुळे काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. महारेराने सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे या प्रकल्पांना काहीसा दिलासा मिळाला आहे, परंतु गृह खरेदीला लागलेली घरघर, आर्थिक कोंडी, गावी परतलेले मजूर अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पांची वाट खडतर आहे. या प्रकल्पांमध्ये घरे खरेदी केलेल्या ग्राहकांचीही कोंडी होणार आहे, असे निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात 2020 च्या अखेरपर्यंत एक लाख सात हजार आणि 2021 पर्यंत आणखी एक लाख तीन हजार घरांचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये या वर्षी जवळपास चार लाख 66 हजार आणि पुढील वर्षी चार लाख 12 हजार नवीन घरे बांधून पूर्ण होण्याची अपेक्षा होती. त्यात पुण्यातील एक लाख 36 हजार, कोलकात्यातील 33 हजार 850, हैदराबादमधील 30 हजार 500 आणि चेन्नईतील 24 हजार 650 घरांचा समावेश असल्याची माहिती ((((????×नरॉक))) प्रॉपर्टीजने दिली आहे.

सरकारने कोंडी फोडावी
अनेक ठिकाणी मजूर उपलब्ध नसल्याने विकासकांना काम सुरू करता येत नाही. बांधकाम व्यवसायाची ही कोंडी दूर करण्यासाठी सरकारने ठोस प्रयत्न करायला हवेत, असे मत नरॉक प्रॉपर्टीजचे अनुज पुरी यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com