Facebook रिक्वेस्ट पडली महागात; महिलेचे 18 लाख घेवून SANTIAGO फरार

फेसबुकद्वारे (Facebook) ओळख झाल्यानंतर एका महिलेला परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी तबल 18 लाख रुपयांना फसवले आहे.
Facebook रिक्वेस्ट पडली महागात; महिलेचे 18 लाख घेवून SANTIAGO फरार
Facebook fraudDainik Gomantak

पुणे: तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले तरी त्याचा फायदा घ्यावा की गैरफायदा हे ज्याचे त्यालाच ठरवावे लागते. तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर तंत्रज्ञान क्षेत्रातील गुन्हेगारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर क्राइम (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे. (Online fraud: Woman dupe of Rs 18 lakh via Facebook)

दरम्यान पुण्यात (Pune) देखील अशीच एक घटना घडली आहे. एका 43 वर्षीय महिलेला एका अज्ञात व्यक्तीने फेसबुक अकाउंट चा वापर करून फसवले आहे. फेसबुकद्वारे (Facebook) ओळख झाल्यानंतर एका महिलेला परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी तबल 18 लाख रुपयांना फसवले आहे. फोन वर बोलून त्यांना कस्टम ड्युटी म्हणून पैसे भरण्यास भाग पाडले गेले आहे. याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय महिलेने तक्रार नोदविली आहे. त्याअंतर्गत आयटी ऍक्ट (IT Act), फसवणूकीनुसार सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Facebook fraud
Goa: लैंगिकअत्याचार प्रकरण, सीबीआयची मोठी कारवाई

ऑनलाइनच्या (Online) माध्यमातून महिलेला फेसबुक रिक्वेस्ट पाठवली आणि त्यातून त्यांचा संवाद वाढत गेला. त्याने त्या महिलेचा संवादातुन विश्वास संपादन केला. एके दिवशी महिलेला गिफ्ट पाठवून तीला त्या गिफ्टमध्ये पैसे असल्याचे भासवले त्याने परदेशात बड्या कंपनीत आधिकारी असल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांना परदेशातून गिफ्ट पाठवत असल्याचे सागितले. गिफ्टमध्ये पैसे देखील असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे ते सोडवून घ्यावे असे पुढील व्यक्तीकडून वारंवार सांगण्यात येत होते.

यावेळी कस्टममधून बोलणाऱ्या व्यक्तींनी त्यांना कितीतरी कारणं सांगून महिलेकडून तबल 18 लाख 12 हजार रुपये उकळले. तरीही महिलेला गिफ्ट मिळाले नाही, दम्यान महिलेला संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत. त्याचे DRASCAR SANTIAGO या नावाचे फेसबुक अकाउंट होते. अद्यापपर्यंत आरोपीस पोलीसांनी अटक केलेली नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com