मॉन्सूनची चाहूल लागताच कोकणात रंगीबेरंगी निसर्गदूतांचे आगमन

With the onset of monsoon colorful nature angels arrive in Konkan
With the onset of monsoon colorful nature angels arrive in Konkan

रत्नागिरी : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) येताना अनेक आनंद घेऊन येतो,  मॉन्सूनने गोव्यासह कोकणात दस्तक दिली आहे. त्यामुळे येथे सर्वत्र हिरव्या गार झाडांची चादर पांघरलेली आपल्याला दिसत आहे. पावसाने हजेरी लावताच पावसाचा संदेश देणारे विविध पक्षी (Birds) कोकणात (Kokan) दिसू लागले आहेत. अशातच रत्नागिरीत मॉन्सूनची वाट पाहणारा चातक पक्षी दिसून आला आहे. त्याचबरोबर नवरंग तिबोटी खंड्या हे पक्षी देखील घरटी करताना दिसत आहेत. 

तिबोटी आणि खंड्या पोमेंडीतील महालक्ष्मी मंदिराजवळील ओढ्याजवळ आढळून आला तर नवरंग हातखंडा परिसरातील आंब्याच्या बागेत दिसला. सुगरणीची घरटी सध्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे दिसून आली आहेत. पांढऱ्या गाय बगळ्यांच्या पिसांचा रंग भडक पिवळा होण्यास सुरुवात झालेली परटवणे येथील खाजण भागात पहावयास मिळाली. अशी माहिती पक्षीमित्र प्रतीक मोरे यांनी दिला आहे.

पूर्वीच्या काळात आत्याधुनिक यंत्रणा नव्हत्या, त्यावेळी निसर्गातील अशाच बदलावरुन मॉन्सून येण्याची वर्दी मिळत होती. त्यात कावळ्यांच्या घरांची उंची त्याची जागा, अंड्यांची संख्या कावळा जेवढ्या उंचीवर घरटे बांधायचा त्यावर त्या वर्षीचा मॉन्सूनचा अंदाज वर्तविण्यात येत होता. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्याला दुजोरा देणारी कावळ्याची घरटी रत्नागिरीतील नाचणे रस्त्यावरील झाडांवर उभारलेली दिसून आली आहेत. टिटवी, ओंबील यांच्या अंड्यांची जागा तसेच रोहिणी आणि मृगाच्या किड्यांचे आगमन महत्वाचे मानले जात होते. 

चिंचेची पाने मे च्या मध्यानात झडू लागतात आणि हे झाड भकास दिसते. पण पावसाची चाहूल लागताच, याला हिरवी गार पालवी फुटण्यास सुरुवात होते. पुढे पावसाला सुरुवात होताच ही पाने इतकी हिरवीगार होतात की त्यात कावळा बसलेला देखील दिसून येत नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com