'बर्ड फ्लू'च्या पार्श्वभूमीवर मृत कावळे आढळल्याने रत्नागिरीत भीतीचे वातावरण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

कोरोनापाठोपाठ आता महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचं संकट ओढावलं आहे. अशातच आज रत्नागिरीमध्ये दिवसभरात मृत कावळे आढळल्याने परिसरात घबराहट पसरली आहे.

रत्नागिरी :  कोरोनापाठोपाठ आता महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचं संकट ओढावलं आहे. अशातच आज रत्नागिरीमध्ये दिवसभरात मृत कावळे आढळल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. रत्नागिरीतील चंद्रभाग गॅस एजन्सीजवळ १ , नारळाच्या  बागेजवळ १ आणि शृंगारीत २ मृत कावळे आढळले. यापैकी नारळ बागेतील कावळा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

शृंगारतळीतील कावळे कुत्र्यांनी खाल्ल्याने तपासणीसाठी पाठवता आले नाहीत. तर एक कावळा विजेच्या धक्क्याने मृत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनापाठोपाठ देशभरात बर्ड फ्लूची साथ आहे. पक्षी मृत पावत  असल्याची माहिती प्रसिद्ध होत असल्याने लोकांमध्ये जागरुकता आणि भितीची संमिश्र भावना आहे. सकाळी सीताराम कॉम्प्लेक्‍समधील चंद्रभागा गॅस एजन्सी व भाजप संपर्क कार्यालयाजवळ कावळा मृत होवून पडला. त्याचा फोटो समाज माध्यमांमध्ये पसरल्यावर घबराट निर्माण झाली.

दरम्यान नगरसेवक समीर घाणेकर आणि बाजारपेठेतील व्यापारी बंधुंनी चंद्रभागा गॅस एजन्सीजवळ कावळा मेल्याचे नगरपंचायतीला कळवले. मुख्याधिकारी कविता बोरकर यांनी ही माहिती आरोग्य खात्याला दिली. आरोग्य खात्याने तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र खांबल यांना बोलावले. त्यांनी कावळ्याची तपासणी केली असता सदर कावळा वीजेच्या धक्क्‌याने मृत झाल्याचे उघड झाले. त्यानंतर खांबल यांनी हिरवे यांच्या बागेतील कावळा पाहिला. सदर कावळ्याचा मृत्यूचे निदान न झाल्याने अधिक तपासणीसाठी मृत कावळा चिपळूण येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आला आहे.शृंगारतळी येथ दोन कावळे मेले. मात्र सदर कावळ्यांना कुत्र्यांनी खाल्ल्‌याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या