बापरे..! पाणीपुरीत शौचालयाचे पाणी ?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

हा पाणीपुरीवाला आपल्या खास चवीसाठी परिसरात अतिशय प्रसिद्ध होता. त्याचे पाणीपुरीचे दुकान रंकाळा तलावाजवळ असून त्याच्याकडे प्रचंड गर्दी होत होती. मात्र, स्थानिकांना त्याच्या या हरकतीची माहिती झाल्यावर लोकांनी राग अनावर होऊन त्याचे दुकानच मोडून काढले.

कोल्हापूर- पाणीपुरी. नाव ऐकलं तरी खवय्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं. मात्र, ही पाणीपुरी खाण्याआधी आपण त्यातील पाण्याबाबत  कधी खात्री केली आहे का?, खात्री केल्यास कदाचित तुमची पाणीपुरी खाण्याची इच्छा कायमची नाहीशी होऊ शकते. महाराष्ट्रातील  कोल्हापूर जिल्ह्यात एका पाणीपुरी विक्रेत्याला यासंबंधी पकडण्यात आले असून तो मसाला वापरतात त्या पाण्यात चक्क शौचालयाचे पाणी मिसळताना आढळून आला. त्याची ही भामटेगिरी सीसीटीव्ही कॅमेरॅत पकडली गेली असून  स्थानीकांकडून त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केला जात आहे.

  व्हिडीओत दिसणारा हा पाणीपुरीवाला आपल्या खास चवीसाठी परिसरात अतिशय प्रसिद्ध होता. त्याचे पाणीपुरीचे दुकान रंकाळा तलावाजवळ असून त्याच्याकडे प्रचंड गर्दी होत होती. मात्र, स्थानिकांना त्याच्या या हरकतीची माहिती झाल्यावर लोकांनी राग अनावर होऊन त्याचे दुकानच मोडून काढले. यासोबतच त्याच्या खाण्यापिण्याच्या वस्तूही लोकांनी फेकून देऊन त्याची तेथून हकालपट्टी केली. 

संबंधित बातम्या