परळच्या राजाची यंदा तीन फुटांची मूर्ती

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

कमी उंचीची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेणारे पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मुंबई

मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख म्हणजे येथील श्रींच्या मोठमोठ्या मूर्ती होय. या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यामध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजारा करण्याचा निर्णय मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. यामध्ये गणेशमूर्तीची उंची कमी करण्याबाबत मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळच्या राजाने या वर्षी तीन फुटांची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गणेशमूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेणारे ते पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरले आहे. तसेच खेतवाडी 6 वी गल्ली गणेशोत्सव मंडळाचाही या वर्षी गणेशमूर्तीची उंची कमी करणाचा निर्णय विचारधीन आहे. परळच्या राजाची मूर्ती दरवर्षी 23 फुटाची असते. कोरोनाचे संकट लक्षात घेता अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत सामाजिक अंतर राखण्यासाठी, गर्दीची संभाव्यता टाळण्यासाठी गणेशमूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंडळाकडून सांगण्यात आले. तसेच परळच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक निघणार नसून गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये करण्यात येईल.

समन्वय समितीकडून निर्णयाचे स्वागत
विभागातील परळच्या राजाची वर्गणीदेखील न घेण्याचा निर्णय मंडळाने शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्तम निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या