''या'' राज्यातून महाराष्ट्रात य़ेणाऱ्या प्रवाशांना करावी लागणार कोरोनाची चाचणी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र  सरकारने  केरळमधून  महाराष्ट्रात येणाऱ्य़ा  प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी  करावी  लागणार असल्याचे असं जाहीर केले आहे.

मंबई: केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढत आसल्यामुळे  महाराष्ट्र  सरकारने  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  मार्गदर्शक  तत्वे  लागू  केली आहेत. एकीकडे  देशात  कोरोना लसीकरणाची  सुरुवात  झाली  असताना  मात्र  केरळमध्य़े  कोरोनाचा  नवा  स्ट्रेन  झपाट्याने  पसरत  आहे. आता  महाराष्ट्र  सरकारने  केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्य़ा  प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी  करावी  लागणार असल्याचे असं  जाहीर  केले आहे. यापूर्वी  महाराष्ट्र सरकारने  दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि  गोवा  मधून  येणाऱ्य़ा  प्रवाशांवर  कोरोना प्रतिबंधक  लसीची  चाचणी  करण्याचे  बंधनकारक  केले होते. केरळमध्य़े नव्या  कोरोना  स्ट्रेनच्या  रुग्णांची  संख्या  वाढली  आहे. त्य़ामुळे  महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा  उपाय  म्हणून  त्याचबरोबर  राज्यातील  कोरोनाचा  फैलाव रोखण्यासाठी  केरळंमधून  येणाऱ्या  प्रवाशांवर  कोरोना  चाचणी  करण्याचे  बंधनकारक  करण्यात आले आहे.

Corona Update : दोडामार्गात कोरोना लसीकरणास प्रारंभ

तसेच एअरपोर्ट  ऑथोरिटी ऑफ  इंडियाला  महाराष्ट्र  सरकारने  यापूर्वी  जाहीर  केलेल्या मार्गदर्शक  तत्वानुसार  प्रवाशांना  विमानात  बसण्यापूर्वी  त्यांचे  कोरोना  रिपोर्ट  चेक करण्याची  विनंती  केली  होती. देशात  कोरोना  लसीकरणाला  सुरुवात  झाल्यानंतर कोरोनाला  रोखण्यासाठी  यश  आले  होते. मात्र  केरळमधील  कोरोनाच्या  वाढत्या प्रादूर्भवामुळे अजून  एखदा  भितीचे  वातारण  निर्माण  झाले  आहे. महाराष्ट्रात  कोरोनाचा प्रसार  मोठ्याप्रमाणात  झाला  होता. महाराष्ट्राने  कोरोनाचा  प्रसार  रोखण्यासाठी  अनेक उपाययोजनाही केल्या आहेत. मात्र आता  केरळमधील  कोरोनाचा  वाढता  प्रसार  राज्याची चिंता  वाढवत आहे. यामुळे महाराष्ट्राने  उपाययोजना  म्हणून  केरळमधून  महाराष्ट्रात येणाऱ्या  प्रवाशांना  कोरोनाची  चाचणी  करण्याचे  बंधनकारक  केले  आहे.      

संबंधित बातम्या