कोरोनातून बरे झाल्यावरही रूग्णांमध्ये आढळून येताहेत ह्रदयाचे आजार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

याशिवाय कोरोनामधून बरे झाल्यावर काही रूग्णांना प्रमाणात अशक्तपणा जाणवल्याचे लक्षात आले आहे. याशिवाय श्वास घेण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारीही काही बरे झालेले रूग्ण घेऊन येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय काही रूग्णांमध्ये मानसिक समस्याही वाढल्याचे दिसून आले आहे.

पुणे- कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अलिकडे नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाणही बरेच कमी झाले आहे. मात्र, पुण्यातील बऱ्याच रूग्णालयाच्या डॉक्टरांनी बऱ्या होणाऱ्या रूग्णांबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. रूग्ण बरे होऊन परतल्यावर त्यांना पुन्हा ह्रदयाचा त्रास जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

याशिवाय कोरोनामधून बरे झाल्यावर काही रूग्णांना प्रमाणात अशक्तपणा जाणवल्याचे लक्षात आले आहे. याशिवाय श्वास घेण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारीही काही बरे झालेले रूग्ण घेऊन येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय काही रूग्णांमध्ये मानसिक समस्याही वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची अती प्रमाणात भीती वाटणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढली आहे. कोरोनामुळे मानसिक आजारांमध्ये झालेली ही वाढ लक्षात घेता अजूनही कोरोनाचे भय कमी झाले नसल्याचे चित्र आहे. 

सुरूवातीच्या काळात १२ टक्के इतका असलेला मृत्यूदर आता १.४९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे कोरोनावर लस जरी अजून उपलब्ध होऊ शकलेली नसली तरी काही प्रभावी औषधांमुळे मृत्यूदर कमी करण्यात वैद्यकीय क्षेत्राला यश आले आहे. पुण्यात काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वांत जास्त रूग्ण संख्या होती. मात्र, कोरोनाला प्रतिबंध घालण्यात आला कुठेतरी यश येत असल्याचे दिसून येत आहे. तरीही भारतात अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने नागरिकांनी अजूनही या आजाराला हलक्यात घेऊ नये असे तज्ञांचे मत आहे.       
 

संबंधित बातम्या