महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतेच

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

- 2345 नवीन रुग्ण; एकूण संख्या 41,642
- 64 जणांचा मृत्यू; आतापर्यंत 1454 बळी

मुंबई

राज्यात कोव्हिड- 19 विषाणूच्या 2,345 नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 41,642 झाली आहे. आतापर्यंत 1,408 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकूण 11,726 जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आणखी 64 रुग्ण दगावल्यामुळे कोव्हिडबळींचा आकडा 1454 वर पोहोचला आहे. दरम्यान, गुरुवारी मृत्यू झालेले सर्वाधिक 41 रुग्ण मुंबईतील होते.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41,642 झाली असून, 28,454 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत 41, मालेगावात नऊ, पुण्यात सात, औरंगाबाद शहरात तीन, नवी मुंबईत दोन; तसेच पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 36 पुरुष आणि 28 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्यांपैकी 31 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 29 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि चार रुग्ण 40 वर्षांखालील होते. एकूण 38 जणांमध्ये (59 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड- 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1,454 वर गेली आहे.

आतापर्यंत...

तपासलेले नमुने : 3,19,710
निगेटिव्ह : 2,78,068
पॉझिटिव्ह : 41,642
क्‍लस्टर कंटेन्मेंट झोन : 1949
सर्वेक्षण पथके : 15,894
लोकसंख्येची पाहणी : 64.89 लाख
बरे झालेले रुग्ण : 11,726
होम क्वॉरंटाईन: 4,37,304
संस्थात्मक क्वॉरंटाईन : 26,865

संबंधित बातम्या