
Sanjay Raut ED Arrest: पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री अटक केली. मात्र, आपण निर्दोष असल्याचा दावा राऊत (Sanjay Raut Arrest) यांनी केला. त्यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांच्या घरी पोहोचून राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. आज राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणी करण्यासाठी EDने न्यायालयाकडे राऊतांची कोठडी मिळावी, रात्रीचे साडे दहा नंतर आम्ही राऊतांची चौकशी करणार नाही, असे EDने न्यायालयाला सांगितले आहे. खासदार संजय राऊतांना न्यायालयाकडून आज 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर आज शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना EDने न्यायालयात हजर केले. आणि न्यायालयाकडे EDने संजय राऊतांच्या रिमांडची मागणी केली होती. याच मागणीला न्यायालयाने दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता राऊतांना न्यायालयाने EDकोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान EDने न्यायालयाकडे संजय राउतांची आठ दिवसांची कोठडी मागितली आहे. 'महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर ही कारवाई झाली, या कारवाईला राजकीय हेतू आहे. इतके दिवस राऊत यांच्यावर कारवाई का झाली नाही,' असा सवाल राऊतांच्या वकिलांनी न्यायालयाला केला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रविवारी रात्री उशिरा शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केली. दरम्यान, संध्याकाळी उशिरा ईडीच्या सूत्रांनी दावा केला की राऊत यांच्या घरातून 11.5 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. पत्रा चाळ प्रकरणात ईडीच्या साक्षीदार स्वप्ना पाटकरला धमकावल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी रविवारी स्वतंत्रपणे खासदाराविरुद्ध एफआयआर नोंदवला. एक हजार चाळीस कोटींचा पत्राचाळीचा घोटाला
एफआयआर राऊत आणि पाटकर यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवर आधारित आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 504 आणि 509 अंतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी तिला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.