Rescue Operation: लाईफ जॅकेट घालून मी 11 तास लाटांवर तरंगत होतो...

People rescued by the Navy thanked the Navy
People rescued by the Navy thanked the Navy

महाकाय चक्रीवादळ (Cyclone) तौक्ते (Tauktae) मुले देशाच्या अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. याच वादळामुळे मुंबईजवळच्या सागरीसिमेत बार्ज (Barge) आणि बोटी (Boat) अनियंत्रित झाल्याने शेकडो लोक समुद्रात अडकले होते. जवळपास 35 नॉटिकल मिल दूर एवढ्या अंतरावर हे जहाज अडकले असल्याचे सांगितले जात होते. भारतीय वायुदलाकडून ३ दिवसांपासून बचहवकारी सुरु आहे. या बचाव कार्यात (Rescue Operation) आता पर्यंत 186 लोकांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून, 26 मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहे. (People rescued by the Navy thanked the Navy)

'तौक्ते' वादळामुळे बार्ज-305 (Barge-305) समुद्रात बुडाली आहे. या बार्जवरील कर्मचाऱ्यांना नौदलाने (Indian Navy) वाचवल्यानंतर, त्यांनी जवानांचे आभार मानत मृत्यूच्या जबड्यातून परत आल्यानंतरचा भयावह अनुभव सांगितला आहे. वादळामुळे रौद्ररूप धारण केलेल्या समुद्रातील महाकाय लाटा आणि पावसात हे कर्मचारी अडकलेले होते. 'परिस्थिती अत्यंत भयावह होती. लता खूप उंच उंच होत्या, अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून आम्हाला वाचवणाऱ्या जवानांचे आभार' अशा शब्दांत या संकटातून सुखरूप परतेल स्वप्नील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 

समुद्रात अडकलेल्या अमित कुशवाह यांनी 'बार्ज बुडत असल्याने मला समुद्रात उडी मारावी लागली लागली होती, त्यानंतर मी लाईफजॅकेटच्या मदतीने 11 तास समुद्राच्या पाण्यावर तरंगत होतो आणि त्यानंतर मला जवानांनी वाचवले असे म्हणत आपला भयावह अनुभव सांगितलं आहे.

याच घटनेत जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या एका कर्मचाऱ्याला हा थरारक अनुभव सांगताना रडू कोसळले. जर नौदलाचे जवान पोहोचले नसते तर आम्ही कुणीही वाचलो नसतो, नौदलाच्या जवानांचे आभार... त्यांच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत असे म्हणत या कर्मचाऱ्याने आपला अनुभव सांगितला. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून देखील हे बचाव कार्य आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि आव्हानात्मक बचाव कार्य असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिंहाच्या जबड्यात जाऊन अडकलेल्या लोकांना घेऊन येण्यासारखे हे काम आहे अशा शब्दांत या बचाव कार्याचे (Mission 707) वर्णन केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com