कोरोनापासून रक्षण करण्यासाठी घरातच बनवला मिनी हॉस्पिटलचा सेटअप -

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

देशात कोरोना (corona virous) संसर्ग दिवसेनदिवस वाढत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकाना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक स्वतः चे कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करत आहेत. काही श्रीमंत लोकानी चक्क घरलाच मिनी हॉस्पिटल बनवले आहे

देशात कोरोना (corona virous) संसर्ग दिवसेनदिवस वाढत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकाना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक स्वतः चे कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करत आहेत. काही श्रीमंत लोकानी चक्क घरलाच मिनी हॉस्पिटल बनवले आहे, तसेच अनेकजण व्हेंटिलेटर (Ventilator), ओक्सीमीटर (Oximeter), असे इतर वैद्यकीय साधनाचा सेटअप घरोघरी करत आहेत. (people setup mini  hospital at home due to covid pandemic)

कोरोना संसर्ग टाळा, विजेच्या मीटरचे रिडींग स्वतः च पाठवा: जाणून घ्या

खर्च किती येतो- 

घरात तुम्ही ICU चा सेटअप करत असला तर  व्हेंटिलेटरसह इतर वैद्यकीय साधने देखील गरजेचे आहे. यासाठी निरनिराळ्या कंपनीच्या वस्तुनुसार त्याचा खर्च निश्चित केला जातो. यात Non-invasive ventilator साठी पन्नास हजारांपासून अडीच लाखपर्यंत खर्च येऊ शकतो. तसेच घरातच ICU सेटअप करायचं असेल, तर त्यासाठी 15 ते 25 हजारपर्यंत खर्च येतो. 

महाराष्ट्राच्या मदतीसाठी सरसावल्या लता मंगेशकर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होम हेल्थ केअर सर्विसेसची मागणी वीस टक्क्याने वाढली आहे. या सुविधांची अधिक मागणी दिल्लीमध्ये होत आहे. अनेकजण आपत्कालीन स्थितीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून घरातच ICU सेटअप करत आहेत. यासाठी ते पाण्यासारखा खर्च करायला तयार आहेत. आयसीयूसाठी (ICU)आवश्यक असणारे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेन्टर, ऑक्सिमीटर, वैद्यकीय साधने आणि औषधांचा साठा कोरोना काळात ठेवत आहेत. विशेष म्हणजे आयसीयू सेटअपमूळे (ICU Setup) अनेक डॉक्टर कामावर ठेवत आहेत.  त्यामुळे घरच्या घरी योग्य उपचार मिळने सोयीच झाले आहे. ती उपकरणे व्यवस्थित काम करत असेल तर काही लोक आपत्कालीन सेवेकरीता जास्त पैसे देऊन त्यांच्याशी बूकिंग करतील. 

संबंधित बातम्या