'जनतेनं लोकशाहीविरोधी वागणाऱ्यांना धडा शिकवला’

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

भारतातील जनता लोकशाही विरोधी वागणाऱ्यांना  कोणत्याही  परिस्थितीत सोडणार नाही. योग्य वेळ येताच जनतेनं अशा पध्दतीने वागणाऱ्यांना धडा शिकवलेला आहे.

मुंबई: केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याला देशातून तसेच परदेशातूनही जोरदार विरोध होत आहे. गेल्या तीन  महिन्यांपासून  शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. देशातील  एकूण  राजकीय परिस्थिताचा  वेध  घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही सूचक विधाने केली. ‘’देशातील लोकांच्या  मनात लोकशाहीचा  मूळ  विचार  रुजलेला आहे. त्यामुळे  भारतातील जनता लोकशाही विरोधी वागणाऱ्यांना  कोणत्याही  परिस्थितीत सोडणार नाही. योग्य वेळ येताच जनतेनं अशा पध्दतीने वागणाऱ्यांना धडा शिकवलेला आहे.

Farmer protest: गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आक्रमक

देशात जेव्हा आणिबाणी लागली होती, त्यावेळेस हजारो नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे देशासमोर एक अजब परिस्थिती निर्माण झाली होती.अशा परिस्थितीतही देशातील जनतेच्या मनात लोकशाहीची मूळे भक्कपणे रुजलेली होती. त्यामुळे आणिबाणीनंतर लोकांनी ज्य़ावेळी संधी मिळाली तेव्हा लोकशाहीत मनमानी पध्दतीने वागणाऱ्यांना योग्य धडा शिकवला आहे.

नाना पटोले यांनी दिला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षदाचा राजीनामा 

इंदिरा गांधींनाही आणिबाणीनंतर जनतेने सत्तेपासून दूर ठेवले होते. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे  समाजवादी विचारांची शक्ती आपल्या समोर आली. या समाजवादी विचारावर अंखडपणे चालणारे अनेक लाखो लोक अनेक वर्षात तयार झाले. आणि देशाचे हीत लक्षात घेवून त्यांनी  काम  केले. दरम्यान  समाजवादाचा  विचार  जसा  मोठा होत  गेला  तशा  समाजवादी विचाराच्यां  संघटनाही  तयार  झाल्या.’’

कृषी  कायद्यांवरुन  देशात  राजकीय  वातावरण  चांगलच तापलं  आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पुढे येत आपल्या भूमिका मांडल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  गाझीपूर  सीमेवर  जावून शेतकरी  नेते  राकेश टिकैत यांची भेट घेतली. कृषी कायदे केंद्र सरकारने  रद्द  केले  पाहिजेत अशी मागणी शेतकरी संघटनेकडून  करण्यात  येत आहेत.  

 

  

संबंधित बातम्या