केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

ज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेतही भर पडली आहे.  इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर याहून चिंताजनक बाब म्हणजे, लस तुटवड्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमही ठप्प पडली होती. मात्र आता केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मुंबई :  राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेतही भर पडली आहे.  इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर याहून चिंताजनक बाब म्हणजे, लस तुटवड्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमही ठप्प पडली होती. मात्र आता केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.  तसेच, आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र सरकारने हाफकिन इनस्टिट्यूटला लस उत्पादनाची परवानगी  देण्याच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.  (Permission from the central government to the Halfkin Institute to produce corona vaccine)

कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला केली मोठी मदत

केंद्र सरकारने हाफकिन इनस्टिट्यूटला भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीचे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. याबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. '' राज्यात सध्या 1,200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. मात्र राज्याला सध्या उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजन पेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिलच्या अखेर पर्यंत ऑक्सिजनची मागणी दररोज 2 हजार मेट्रिक टनापर्यंत जाऊ शकते, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपलया पत्रात म्हटले आहे. तसेच, सध्या देशाच्या पूर्व आणि  दक्षिण भागातून स्टील प्रकल्पातून ऑक्सिजन घेण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकार स्थानिक व आसपासच्या भागातून ऑक्सिजनकहा पुरवठा करत आहे. परंतु वेळेची बचत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हवाइमार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी त्वरित कार्यवाही करणेदेखील तितकेच गरजेचे बनले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.  

गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये देशभरात 10.5 लाख सक्रिय रुग्ण होते. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात येत असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.  सध्या राज्यात 5.64 लाख कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. तर रूग्णसंख्या वाढीचा वेग पाहता  30 एप्रिलपर्यंत राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 11.9 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  तसेच, भारतीय पेटंट अ‍ॅक्ट  1970 च्या कलम 92 अंतर्गत रेमीडिसीवीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर केंद्र सरकारने स्थिगीति दिल्याच्या निर्णयासाठीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती परवानगी देण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. '' कोरोना महामारीत राज्याला असंच सहकार्य मिळेल, असे ट्विट करत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. 

संबंधित बातम्या