महाराष्ट्रापेक्षा 'या' भागात पेट्रोल-डिझेल स्वस्त

कर्नाटकात (Karnataka) गेलेले प्रवाशी आपली वाहनाची टाकी तेथेच फुल्ल करतात.
महाराष्ट्रापेक्षा 'या' भागात पेट्रोल-डिझेल स्वस्त
petrol dieselDainik Gomantak

बेळगाव: कर्नाटकमध्ये (Karnataka) पेट्रोल व डिझेल (Petrol Diesel) स्वस्त असल्याने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील याचा मोठा फटका बसत आहे. नोव्हेंबरला महिन्याच्या सुरुवातील घेतलेला तेलाचा साठा अद्यापर्यंत संपलेलाच नाही. सांगली, मिरज आणि जत तालुक्यातील पंपांची विक्री तर पूर्णपणे थंडावली आहे असे चित्र दिसून येत आहे. 3 नोव्हेंबरला केंद्र सरकारने दरकपात केली आहे त्यामुळे या भागातील विक्री ठप्प झाली आहे. म्हैसाळ, सलगरे, आरग, एरंडोलीसह जत भागातील पंपावर तर शांतता असल्याने येथील पंप धारकांचे लाखोंचे नुकसान होत आहे.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उगार, कागवाड, अथणी, मंगसुळी भागात पेट्रोलची किंमत 100.33 रुपये असून डिझेलच किंमत 84.79 रुपये लिटर दर आहे. तर महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावांत पेट्रोलाला 109.69 रुपये तर डिझेलसाठी 92.51 रुपये नागरिकांना द्यावे लागत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सीमेवर पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त मिळते. यामुळे प्रवासासाठी कर्नाटकात गेलेले प्रवासी आपल्या वाहनाची टाकी तेथेच फुल्ल करून घेतात. 50 लिटर डिझेलमागे सुमारे पावणेचारशे रुपयांपरंत बचत होते. तर सीमेवरील रहिवासी रोजच्या इंधनासाठी गावातील पंपावर न जात कर्नाटकात जात आहेत.

petrol diesel
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

दरम्यान, कर्नाटकातील पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’ असे पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत. आणि याचा मोठा फटका महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पंपांना बसत आहे. सरासरी दररोज दहा हजार लिटरची विक्री करणाऱ्या पंपांवर आता दिवसभरात फक्त 200-300 लिटर इतकेही इंधन खपत नाही असे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, राज्यातील पंप धारकांकडून सरकार आणि तेल कंपन्यांकडे त्यांची होणारी नुकसान भरपाई मागण्याची तयारी सुरु केली आहे. 3 नोव्हेंबरनंतर बॅंकांना दिवाळी सुट्या मिळाल्याने मोठ्या प्रमाणात तेलाचा (Oil) साठा केला होता. आता दिवाळीनंतर पर्यटकांची वाढ होत असल्याने महामार्गांवरील पंपांवर 45 ते 90 हजार लिटर तेलसाठा होता. परंतु अचानक कमी झालेल्या दराने कोट्यवधींचा भुर्दंड पंप चालकांना बसला. याबतच्या नुकसानीचा तपशील गोळा करण्याचे काम पेट्रोल, डिझेल डिस्ट्रीब्यूटर्स फेडरेशनकडून (Distributors Federation) सुरू करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन (Online) फॉर्ममध्ये याबाबतची माहिती देखील भरून घेतली जात आहे.

petrol diesel
महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेल दरवाढीला तूर्तास दिलासा नाही; अजित पवार

या जिल्ह्यात 7 कोटींचा फटका:

केंद्राकडून 3 नोव्हेंबर रोजी अचानक पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्याने पंपचालकांना मात्र मोठे नुकसान सोसावे लागले. प्रत्येक पंपाचे नुकसान सरासरी 3 लाख रुपये असावे. तर सांगली जिल्ह्यातील 240 पंपांना 7 कोटींचा फटका बसला. आणि महाराष्ट्र राज्यातील साडेसहा हजार पंपांचे सरासरी तीन लाख या प्रमाणे सुमारे 350 कोटींचे नुकसान झाले आहे असा दावा फेडरेशनने केला आहे. भविष्यात इंधन दर कपात करायची असल्यास किमान 15 दिवस अगोदर त्याबाबत सूचना जारी कराव्यात अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com