कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना उद्यापासून

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना उद्यापासून (ता. २१) सुरवात होणार आहे. ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित करण्यात येणार आहे.

पुणे: कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना उद्यापासून (ता. २१) सुरवात होणार आहे. ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित करण्यात येणार आहे. ती ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केली असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.  

डॉ. तांबे म्हणाले, सोमवारपासून (ता. २१) तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू करण्याचा आमचा विचार आहे. शनिवारपासूनच आम्ही स्वयंसेवकांची भरती करायला सुरवात केली आहे. साधारणपणे १५० ते २०० स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल.’’ दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुण्यातीलच केईएम रुग्णालय आणि भारती विद्यापीठ रुग्णालयात घेण्यात आल्या होत्या. आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ‘ससून’मध्ये सुरू होत आहेत. इंग्लंडमधील स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान त्रास जाणवल्याने अस्ट्राझिंका या कंपनीने चाचण्या थांबविल्या होत्या. अस्ट्राझिंका ही सिरम इन्स्टिट्यूटची युरोपातील भागीदार कंपनी आहे. 

संबंधित बातम्या