सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

सह्याद्री पर्वत रांगेत कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञांनी नव्या वनस्पतीचा शोध लावला असून या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावे समर्पित करण्यात आले आहे.

मुंबई: सह्याद्री पर्वत रांगेत कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञांनी नव्या वनस्पतीचा शोध लावला असून या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावे समर्पित करण्यात आले आहे. या नव्या वनस्पतीचे ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ (Arjyreia sharadchandrajii ) असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत हे समर्पण असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले.

गारवेल कुळातील ही वनस्पती असून डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्षे या कुळातील वनस्पतीचे संशोधक म्हणून जगविख्यात आहेत. आजपर्यंत त्यांनी या गारवेल कुळातील पाच नव्या प्रजातींचा शोध लावला असून जगभरात या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या नव्या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या ‘रिडीया’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

तुम्ही मून वॉक, कॅट वॉक बघितला आता कॉक वॉकही बघा व्हिडिओ व्हायरल 

सह्याद्री पर्वताच्या ‘आलमप्रभू देवराई’त  या वनस्पतीचा शोध लागला. ही वनस्पती 2016 मध्ये सर्वप्रथम शोधण्यात आली. त्यावर तीन वर्षे संशोधन केल्यानंतर जगाच्या कोणत्याही भागात असे साधर्म्य व वैशिष्ट्य असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण शोधाला नाव देण्याचा अधिकार मिळतो. जगभरातील वनस्पतितज्ज्ञ या संशोधनाचा सर्वंकष अभ्यास करून संशोधकाने सुचवलेले नाव अंतिम करतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान ग्रंथातून हे संशोधन प्रकाशित होते व संबंधित नव्या वनस्पतीला संशोधकाने सुचवलेले नाव बहाल करण्यात येते. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्यानंतर आता शरद पवार यांना समर्पित केलेल्या ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला मान्यता मिळाली आहे. सदर संशोधनास श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे अध्यक्ष के. जी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांचे सहकार्य लाभले. 

तूम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात: परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने फटकारले 

अशी आहे नवी प्रजाती

डॉ. विनोद शिंपले व डॉ. प्रमोद लावंड यांनी शरद पवार यांना समर्पित केलेल्या नव्या संशोधित वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात. तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान फळे येतात. ही वनस्पती वेलवर्गीय आहे. इतर वेलवर्गीय प्रजातीच्या तुलनेत या वनस्पतीला फळे मोठी येतात. त्यांचा रंग पिवळा असतो. जगभरात या पोटजातीच्या वनस्पती मुख्यत्वे अशिया खंडात सापडतात.

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला पवार यांचे नाव!
डॉ. शिंपले व डॉ. लावंड या दोन्ही संशोधकांचे मी कुटुंबाच्या वतीने आभार मानते. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असे साहेब नेहमी सांगतात. त्यामुळे असा आदर आणि सन्मान हा कुटुंबातच होवू शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन हे साहेबांच्या नावे समर्पित केले याचा मला नितांत आदर आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार

संबंधित बातम्या