"घरी परतणाऱ्या मजुरांकडून महाराष्ट्र पोलीस करता आहेत वसुली"

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

लॉकडाऊनमुळे घरी निघालेल्या प्रवाशांकडून पोलीस पैसे वसूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असताना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्याच पार्शवभूमीवर देशातील वेगेवेगळ्या राज्यात अंशतः लॉकडाऊन सारखे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या  असलेल्या महाराष्ट्र सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू  निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे घरी निघालेल्या प्रवाशांकडून पोलीस पैसे वसूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Police are recovering from the workers returning home due to Lockdown)

भाजपशासित राज्यात कोरोनाची खोटी आकडेवारी? स्मशानभूमीने सत्य आणलं समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्याची  केली. यापूर्वीच अनेकवेळा राज्यातील वेगेवेगळ्या मंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सांगितले होते, त्यामुळे परराज्यातून आलेले मजूर मोठ्या संख्येने परत आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले होते. लॉकडाऊन मुळे आपल्या गावी निघालेल्या प्रवाशांकडून महाराष्ट्र पोलीस पैसे वसूल  असा आरोप काही प्रवाशांनी  केला आहे. महाराष्ट्रउन इंदौरकडे जाणाऱ्या टॅक्सी चालकाने, "आम्ही आपल्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे लॉकडाउनच्या काळात आपल्या मूळगावी निघालो असताना  महाराष्ट्र पोलिसांनी आमच्याकडून पैसे वसूल केले" असा आरोप केला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात लागू  करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणे, नागपूर आणि राज्यात इतर वेगवेगळ्या ठिकाणी रोजगारासाठी आलेले परप्रांतीय मजूर पुन्हा आपल्या मूळगावी निघाल्याचे पाहायला मिळते आहे. मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वे आणि रस्त्यावर मोठी गर्दी असल्याचे पाहायला मिळते आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश पोलिसांनी नाश्त्याची व्यवस्था  मिळते आहे. 

संबंधित बातम्या