Naxal: गडचिरोलीत नक्षली आणि पोलिसांत चकमक; 13 नक्षली ठार

Naxal: गडचिरोलीत नक्षली आणि पोलिसांत चकमक; 13 नक्षली ठार
gadchiroli naxal attack.jpg

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) नक्षली (Naxal) आणि पोलिसांमध्ये (Police) चकमकीच्या अनेक घटना घडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आज पुन्हा एकद नक्षली आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत पोलिसांनी तब्बल 13 नक्षलींना कंठस्नान घातले आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 13 नक्षली ठार झाले असले तरी हा एकदा 16 पर्यंत जाण्याची शकता आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Police killed 13 Naxalites in Gadchiroli)

गडचिरोली येथील पयडी-कोटमी भागात नक्षली आणि पोलसांत मोठी चकमक झाल्याची माहीत  मिळाली असून,  महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 दलाच्या जवानांकडून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 13 नक्षलींना ठार केले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. घटनेची माहीत मिळताच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिली वळसे पाटील यांनी गडचिरोली मध्ये जाऊन घटनस्थळी भेट दिली असल्याचे समजते आहे. 

दरम्यान, पोलिसांनी गडचिरोलीच्या पैदि परिसरात असलेल्या जंगलात गुरुवारी रात्री पासूनच शोध मोहीम राबवली जात होती. पोलिसांना गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी नक्षलींच्या हालचाली सुरु होत्या. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com