जळगाव दुर्घटना: रक्षणकर्त्यांनीच केले होस्टेलच्या मुलींसोबत वाईट कृत्य

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

पहिल्या मजल्यावरील मुलींचा हो गोधळ पाहिल्यानंतर मुलींनी खळबळ उडविली आहे. या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जळगाव: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एक अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथे काही पोलिस कर्मचाऱ्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, त्यांनी मुलींना तपासणीच्या नावाखाली आशादीप नावाच्या मुलींच्या वसतिगृहात कपडे काढून नग्न केले आणि अशा अवस्थेत त्या मुलींना डान्स करायला लावला. जेव्हा एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेला हे लक्षात आले तेव्हा त्यांनी वसतिगृह गाठले परंतु वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी त्यांना आत येऊ दिले नाही. जेव्हा स्वयंसेवी संस्थेतील लोकांना आत येऊ दिले नाही तेव्हा वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील मुली स्वत: वर ओरडायला लागल्या. आणि हा आरोप करायला लागल्या. 

बलात्कार पिडीता, निराधार, अत्याचार झालेल्या प्रकरणातील महिलांना आसरा नसणाऱ्या महिला- मुलींसाठी शहरात आशादिप शासकिय वसतीगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींचे निवेदन जिल्‍हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्याचबरोबर रात्री या प्रकरणाचे व्हिडीओ व्हॉटस्‌ॲपवर व्हायरल झाले होते. या प्रकरणाचा मुद्दा आजच्या विधीमंडळाच्या कामकाजात चांगलाच गाजला. पहिल्या मजल्यावरील मुलींचा हो गोधळ पाहिल्यानंतर मुलींनी खळबळ उडविली आहे. या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चार सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज बुधवारी दिली.

“ एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे समिती गठीत करण्यात आली असून त्यात 4 महिला अधिकाऱ्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या महिला अधिकाऱ्यांनी होस्टेलवरील मुलींशी चर्चा  करणार. जे काही सत्य आहे ते बाहेर येईल आणि त्यानंतर या प्रकरणातील आरोपींवर येग्या ती कारवाई करण्यात येईल,” असे जिल्हाधिकारी अभिजित यांनी सांगितले.

विरोधी पक्षातील सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर मंत्र्यांनी राज्य विधानसभेत ही घोषणा केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आणि ते या प्रकरणावर गंभीर नसल्याचे सुचविले आहे.

 

 

संबंधित बातम्या