मुंबईकरांनो..काळजी घ्या ! शहराचे प्रदूषण धोकादायक पातळीवर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

गेले काही दिवस मुंबईकर हवेतील गारठा अनुभवत असून, शहराच्या प्रदुषणात गंभीर वाढ झाली आहे. ​

मुंबई : गेले काही दिवस मुंबईकर हवेतील गारठा अनुभवत असून, शहराच्या प्रदुषणात गंभीर वाढ झाली आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 320 वर पोहोचला, जो श्वासनासंबंधी समस्या असणाऱ्यांसाठी धोकाजदायक मानला जातो. त्यामुळे, श्वासनाचे आजार असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात सुरू होणार जेल टूरिझम

शहरातील हवेच वोग मंदावल्याने धूलीकण जमिनीलगत राहत अहेत, त्यामुळे शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ झाली आहे. मालाड परिसरातील हवा सगळ्यात जास्त प्रदूषित असून, मालाडचा हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट 353 नोंदवला गेला आहे.

‘ऑनलाइन’ शिक्षणाच्या छायेत दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर 

भांडूप आणि वरळीमध्ये मध्यम स्वरूपाच्या प्रदूषणाची नोंद झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 162 आणि 190 आहे. वरळी आणि भांडूप वगळता मुंबईतील इतर विभागात ही हवेची पातळी अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. त्यात बीकेसी 318, माझगाव 314,अंधेरी 330, कुलाबा 331, चेंबूर 329 या भागांचा समावेश आहे.

 

 

 

संबंधित बातम्या