'बदनामी थांबवा नाही तर आत्महत्या करु’ पूजा चव्हाणच्या वडिलांचे भावनिक आवाहन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

‘सध्या पूजाची चाललेली बदनामी थांबवली नाही तर मला माझ्या कुटुंबासमवेत आत्महत्या करावी लागेल’

बीड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्य़ा प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचा या आत्महत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पूजा चव्हाणच्या वडिलांनी भावनिक साद दिली आहे. यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. ‘सध्या पूजाची चाललेली बदनामी थांबवली नाही तर मला माझ्या कुटुंबासमवेत आत्महत्या करावी लागेल’ असा इशारा माध्यमाशी बोलताना दिला आहे. त्याचबरोबर पूजा चव्हाणच्या संपूर्ण कुंटुबाने ही बदनामी त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

संजय राठोड पोहरादेवीला पोहोचले; काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

''आम्ही आता पूजाच्या मृत्यूनंतर कसंतरी सावरत आहोत. आलेला एक एक दिवस पाठीमागे टाकत आहोत. तेवढ्यातच तिच्याबद्दल टिव्हीवर नवीन काहीतरी दाखवण्यात येते. माझी मुलगी एक राजकिय कार्यकर्ती होती हे तर सगळ्यांना माहीत आहे. तिचे राजकिय जीवनातील कितीतरी फोटो आहेत. मात्र एकाच व्यक्तीबरोबरचे फोटो सतत का दाखवले जातात. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना तिचे फोटो जोडून तिची बदनामी करण्यात येत आहे. तिला न्याय मिळायलाच हवा. माझी एक मुलगी गेली. ते असं पाहून माझ्या दुसऱ्या मुलीशी कोण लग्न करेल? आता माझ्य़ासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर माझ्या मुलीसोबत जाऊन न्यायालयासमोर आत्महत्य़ा करणे नाही तर य़ा चालू असणाऱ्या बदनामीच्या विरोधात न्यायालयात केस दाखल करणे,'' असं पूजाचे वडील म्हणाले.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आठवडाभर पूर्ण लॉकडाउन

त्यासोबतच पूजाच्या लहान बहिनीने सुध्दा आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे, ‘’या बदनामीमुळे माझ्या आई आणि वडिलांना काही झालं तर माझं पालनपोषण तुम्ही करणार आहात का?  माझी जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असे प्रश्न पूजाची लहान बहिण दियाने उपस्थित केले आहेत. ती 11 वीपासून राजकारणात आहे. तिचे फोटो पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्य़ासोबत आहेत. मात्र त्य़ांच्याबरोबर असणारे फोटो कधी व्हायरल होत नाहीत?’’ असाही प्रश्न दियाने उपस्थित केला.   

संबंधित बातम्या