सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वेच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

वेळेच्या बंधनाबद्दल नोकरदारांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याने, लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

मुंबई :  कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे काल 10 महिन्यांनी पुन्हा सुरू झाली. काल 1 फेब्रुवारीपासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने सर्वसामान्यांकडून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान, लोकलची दारं सर्वसामान्यांसाठी खुली झाली असली, तरी लोकल प्रवास करण्यासाठी वेळेचं बंधन असून त्याचे उल्लंघन केल्यास प्रशासनाकडून दंड ठोठावला जात आहे.

 ‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ ला ठोकले सील!

29 जानेवारीला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वसामान्यांसाठी ही लोकल सेवा सुरू झाली असली, तरी यासाठी वेळेची काही बंधने घालण्यात आली आहेत. ठरवून दिलेल्या वेळेतच सर्व प्रवाशांना लोकलने प्रवास करता येत आहे.

'व्हँलेटाईन विक' सेलिब्रेट करताय तर आताच व्हा सावधान!

या वेळेच्या बंधनाबद्दल नोकरदारांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याने, लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “लोकांच्या सोयीला नेहमीच पाराधान्य दिलं जाईल. लोकलच्या वेळेत बदल करण्याची गरज असेल, तर तसा प्रस्ताव वक्कीच दिला जाईल”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.लोकलमधून प्रवास करण्यासाठी वेळेचे तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना या वेळेत लोकल प्रवास करण्याची परवानगी आहे

 सकाळी 7 च्या आत, दुपारी 12 ते 4 व रात्री 9 नंतर

या वेळेत लोकल प्रवास करण्याची परवानगी नाही

सकाळी 7 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवास करता येणार नाही. या वेळांमध्ये केवळ विशिष्ट प्रवर्गातील व सरकारने परवानगी दिलेल्या नागरिकांनाच प्रवास करता येणार नाही.

संबंधित बातम्या