महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता..?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

 दिवाळीनंतर महारष्ट्रातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत असून, कोरोनाची महाराष्ट्रातील परिस्थिती अशीच बिघडत राहिली, तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन करावी लागण्याची चिन्हे आहेत, याबद्द्लचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

मुंबई : दिवाळीनंतर महारष्ट्रातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत असून, कोरोनाची महाराष्ट्रातील परिस्थिती अशीच बिघडत राहिली, तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन करावी लागण्याची चिन्हे आहेत, याबद्द्लचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, "दिवाळीआधी गणेशोत्सवादरम्यान देखील लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. दिवाळातही तशीच परिस्थिती होती. संबंधित विभागांशी आमची चर्चा सुरू आहे, येत्या ८-१० दिवसांत राज्यातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेऊन  लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. दिवाळीदरम्यान, कोरोना गर्दीने मरतो अशा अविर्भावात नागरिक घराबाहेर पडले, अशी नाराजीदेखील त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तसेच कोरोनाचा दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात असल्याने सरकारने शाळा सुरू करण्याबाबत आणखी कठोर नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये, शिक्षकांची कोरोना चाचणी करणे, शाळाचे निर्जंतुकीकरण याचा समावेश आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील नागरिकांना काळची घेण्याचे न सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. आता जर काळजी घेतला नाही, तर कोरोनाची नवी लाट त्सुनामीएवढी भयंकर असेल, असं ते म्हणाले. ही परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास पुन्हा  लॉकडाऊन  होण्याची शक्याता आहे.

अधिक वाचा : 

‘कोरोनाची लस आलेली नाही,भान ठेवून वागा’ ; उद्धव ठाकरेंचे नागरिकांना आवाहन 

संबंधित बातम्या