कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक;  मोठ्या निर्णयाची शक्यता 

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

महाराष्ट्रात कोरोना विषणूचा संसर्ग वाढत चालला असून कोरोना रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने खबरदारीच्या सर्व उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र केवळ कडक निर्बंध लावून साखळी तोडणे शक्य नसल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषणूचा संसर्ग वाढत चालला असून कोरोना रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने खबरदारीच्या सर्व उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र केवळ कडक निर्बंध लावून साखळी तोडणे शक्य नसल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक पारपडली. यात  राज्यभरात पुन्हा लॉकडाऊन बाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  (The possibility of a major decision at the CM’s meeting to break the corona chain) 

आज निर्णय नाही घेतला तर उद्या लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवेल; मुख्यमंत्र्यांचा...

दरम्यान, महाराष्ट्रात काल दिवसभरात, 56 हजार 286 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  मागील 24 तासात 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 376 जणांनी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर राज्यात आता 5 लाख 21 हजार 317 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बारे होण्याचे प्रमाण 82.05 टक्के आहे तर मृत्यूदर 1.77 टक्के इतका आहे. तथापि, राज्यात आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 57 हजार 028 वर पोहोचला आहे. सध्या 27 लाख 2 हजार 613 जण गृह विलगीकरणात आणि 22 हजार 661 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 

कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू

दरम्यान लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूढील तीन आठवड्यांसाठी कडक लॉकडाऊन लावणे आवश्यक असल्याबबत चर्चा करण्यात आली. याबाबत येत्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच,  तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा, मात्र या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

त्याचबरोबर, अकरा तारखेला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. मात्र कोरोनामुळे तीदेखील पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच पूढील परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. तसेच, राज्यातील सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डासह विविध परीक्षाही पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्रसरकारने   केंद्र सरकारकडे मागणी केली असल्याचे वडेट्टीवार म्हटले आहे. 
 

संबंधित बातम्या