महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू ? पुढच्या आठवड्यात निर्णयाची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रात कोरोनाचा वढता प्रादुर्भव बघता सरकारकडून मोठा निर्णय घएण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिल्यास, 12 तासांचा नाईट कर्फ्यु लागू केला जाऊ शकतो.

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोनाचा वढता प्रादुर्भव बघता सरकारकडून मोठा निर्णय घएण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिल्यास, 12 तासांचा नाईट कर्फ्यु लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्राचे मदत व पुनर्वस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की या कर्फ्यू दरम्यान लग्न कार्यालय,मार्केट, सिनेमा हॉल यासारख्या गर्दीच्या जागा पूर्णपणे बंद कऱण्यात येतील. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत निर्बंध लावण्याचा विचार सरकार करत आहे.

सातारा, अमरावती जिल्ह्यासंह तीन जिल्ह्यात कोरोनाचा विदेशी स्ट्रेन ?

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती खालावली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाईट कर्फ्यूबाबत पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत. यानंतर या कर्फ्यूबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. निर्बंधांव्यतिरिक्त दंडांवरही सरकारने यावेळी कठोर कारवाई करण्याचादेखील निर्णय घेतला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करून जर लग्न कार्यालयात 50 हून अधिक लोक जमल्याची घटना घडल्यास,1 लाख रुपये दंड आकारला जाईल.

महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा विळखा; या नेत्यांना झाली दुसऱ्यांदा लागण

विदर्भात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. नागपुरातही शुक्रवारी 750 हून अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. वर्धा,यवतमाळ व अमरावतीत आंशिक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.वडेट्टीवार म्हणाले, "नवीन प्रकरणे वाढल्यास सरकार नाईट कर्फ्यूसारखी पावले उचलू शकते. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाला आपल्या भागातील परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे.” नागरिक बेजबाबदारपणे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत कोरोनात वाढ होण्याची भिती व्यक्त केली.

संबंधित बातम्या