महाराष्ट्रात 18  ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती 

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 18 ते 44  वयोगटातील कोविड -19 लसीकरण मोहीम स्थगित करन्याचा निर्णय घेतला आहे.  लसीचा उर्वरित साठा  45 पेक्षा अधिक वयोगटातील  लोकांच्या लसीकरणासाठी  वापरण्यात येणार आहे.

मुंबई :    महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 18 ते 44  वयोगटातील कोविड -19 लसीकरण मोहीम स्थगित करन्याचा निर्णय घेतला आहे.  लसीचा उर्वरित साठा  45 पेक्षा अधिक वयोगटातील  लोकांच्या लसीकरणासाठी  वापरण्यात येणार आहे.  हा काही  दिवसांचा प्रश्न आहे,  लसीचा तुटवडा असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेला स्थगिती देण्यात आली आहे.  सध्या राज्यात 2.75 लाख लसी शिल्लक आहेत. या लसी 45 वयापेक्षा अधिक लोकांसाठी वापरण्यात येणार आहे.  दुसर्‍या डोसची व्यवस्था करणे हे प्राधान्य आहे.  अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  (Postponement of vaccination of citizens in the age group of 18 to 44 years in Maharashtra) 

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन? 

त्याचबरोबर, राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आता म्यूकरमायकोसिस ग्रस्त रूग्णांना इंजेक्शन देण्यासाठी 1 लाख व्हायल्स राज सरकार खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे राज्यात यावर विनाशुल्क उपचार केले  जातील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.  राज्यात आतापर्यंत 2000 लोकाना म्युकरमायकोसिस ची लागण झाली आहे. तर 8 जणांनी या आजारमुळे आपले प्राण गमावले आहेत. या रुग्णांसाठी विशेष  कक्ष बनवले जात असल्याचेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. त्याचबरोबर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्यासंबंधीही निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.  दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर ही निर्बंध 14 मे पर्यंत  वाढवण्यात आले होते.  या काळात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली होती. तर चार तासांसाठी आवश्यक खाद्यपदार्थांच्या खरेदीस परवानगी दिली होती. 

गेल्या काही दिवसांत राजधानी मुंबईत नवीन प्रकरणांमध्ये घट झाली असली तरी महाराष्ट्र दररोज  60 हजाराच्या आसपास नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे  राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आहे.  आज राज्यात 71  हजार 966  रूग्ण कोरोनातून  मुक्त झाले आहेत.  40 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 793 रुग्णांनी कोरोना मुळे आपला जीव गमावला आहे. 

संबंधित बातम्या