तळकोकणात" मिरग "पूजण्याची प्रथा कायम..

तळकोकणात" मिरग "पूजण्याची प्रथा कायम..
vengurla 1.jpg

तळकोकणात" (Konkan) मृग नक्षत्रला" (Mrig Nakshatra) फार महत्त्व आहे . कोकणात याला "मिरग "अस म्हटलं जातं. मिरगाचा पहिला पाऊस पडला कोकणातला शेतकरी राजा आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तभावाने हाक मारतो त्यानंतरच खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते.

सिंधुदुर्गातल्या (Sindhudurg) वेंगुर्ले (Vengurle) तालुक्यातील पेंढूर गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने " मिरग" पूजण्याची  प्रथा अजूनही कायम आहे. ज्या शेतात शेतकरी कसतो त्याच शेतामध्ये प्रत्येक जण नारळ, आंब्याची पाने, साखर, देवाला अर्पण करून  देवाला साकडं घातलं जात.त्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते असे स्थानिक गावकरी सांगतायत.

प्रामुख्याने शेतीच्या कामांना सुरुवात करताना कोणालाही कोणतेही दुखापत होऊ नये तसेच बेलना सुद्धा कोणतेही इजा होऊ नये त्याचप्रमाणे शेतामध्ये आपण शेती करतो ती चांगल्या प्रकारे उघवावी आणि त्याचा फायदा पूर्ण शेतकऱ्यांना व्हावा श्रीफळ वगरे देवाला ठेवण्याची पूर्णपणे पारंपरिक पद्धत आहे 

आम्ही तरुण शेतकरी वर्ग सुद्धा या पारंपरिक पद्धतीचा तंतोतंत पालन करतो ज्या भूमीतून पीक घेतो त्याच भूमीला आमच देणं लागत त्यासाठी आम्ही साकडं घालतो 

Related Stories

No stories found.