मोदींचा पुतळा रातोरात हटवला

पुण्यात एका तरुणाने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मंदिर उभारले होते . या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा देखील बसवला होता .
Prime Minister Narendra Modi's statue removed
Prime Minister Narendra Modi's statue removedDainik Gomantak

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यात एका तरुणाने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मंदिर उभारले होते . या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा देखील बसवला होता . मात्र आता हा पुतळा हटवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याने सारेजण चकित झाले आहेत. हा पुतळा आता जवळच असलेल्या भाजप कार्यालयात हलवण्यात आल्याचे समजत आहे.

Prime Minister Narendra Modi's statue removed
पुण्यात उभारले चक्क नरेंद्र मोदींचे मंदिर

मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे मंदिर उभारलं होत . परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मंदिराचे उदघाटनही करण्यात आले होते. आणि त्यानंतर हे मंदिर देशात मात्र चर्चेचा विषय ठरले. यावर बरीच टीकादेखील झाली होती आणि या टीकेनंतच भाजप नेतृत्त्वानं याची दखल घेत. खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. हा पुतळा आता हलवण्यात आला आहे.

दरम्यान रात्रीपासून मुर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवच चोरीला गेला म्हणत आम्ही कुणाला साकडे घालायचे?आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार ? , यापुढे पेट्रोल,डीझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? आमच्या नवसाला कोण पावणार ? असा असंख्य सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले आहे. इतकेच नाही तर मुर्ती चोरी गेल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार. आता तरी महागाई कमी करणार का? म्हणत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह याठिकाणी जाऊन आंदोलन केलेआहे . राष्ट्रवादीच्या वतीने मंदिराबाहेर आरती करत खोचकपणे पेट्रोल, डीजल, गोड तेल आणि मसाल्यांचा नैवद्य देखील दाखवण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com