नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

Govind chawan
Govind chawan

मुंबई

"मदर्स डे', "वन रूम किचन', "दुधावरची साय', "चॉईस इज युवर्स', "यू टर्न', "हिमालयाची सावली' या नाटकांची निर्मिती करणारे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेजने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी तसेच एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर बोरिवली-वजिरा नाका येथील स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक राजेश देशपांडे, निर्माते राहुल भंडारे, तसेच बोरिवली येथील नाट्य परिषदेचे काही सदस्य यांनी स्मशानभूमीत जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
गोविंद चव्हाण हे बोरिवली येथे राहात होते. रविवारी दुपारी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली; मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली व त्यांचे निधन झाले, अशी माहिती "हिमालयाची सावली' या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली. अत्यंत मनमिळाऊ आणि सतत हसरा चेहरा असणारे गोविंद चव्हाण यांनी अनेकांना मदतही केली आहे. "यू टर्न' हे आनंद म्हसवेकर लिखित व दिग्दर्शित त्यांचे नाटक कमालीचे गाजले. सध्या रंगभूमीवर त्यांची निर्मिती असलेले "हिमालयाची सावली' हे नाटक चांगले गाजत होते. अभिनेता शरद पोंक्षे यांनी यामध्ये मुख्य भूमिका केली आहे. बोरिवली नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com