पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता. २३) शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या, पण मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी दिलेला ठाम नकार, संस्थाचालक, शिक्षक यांचा विरोध लक्षात घेता, महापालिकेला हा निर्णय बदलावा लागला आहे. 

पुणे : पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता. २३) शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या, पण मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी दिलेला ठाम नकार, संस्थाचालक, शिक्षक यांचा विरोध लक्षात घेता, महापालिकेला हा निर्णय बदलावा लागला आहे. पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनामुळे शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसताना विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी विरोध दर्शविला होता. तरीही राज्य सरकारने हा निर्णय बदलला नाही. त्यानंतर स्थानिक प्रशासनावर याबाबत निर्णय घेण्याचे सोपविण्यात आले होते. 

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे सह इतर ठिकाणी आताच शाळा सुरू केल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण पुणे महापालिकेने २३ नोव्हेंबरपासून सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले होते. मात्र, हा निर्णय २४ तासाच्या आत माघारी घेण्याची वेळ महापालिकेवर आली.

 

 

संबंधित बातम्या