गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्यसाठ्यावर धाड

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्यसाठ्यावर खेड तालुक्‍यातील लोटे माळ येथे धाड टाकली. यामध्ये 7 लाख 72 हजार 800 रुपयांची रोख रक्कम आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी: उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्यसाठ्यावर खेड तालुक्‍यातील लोटे माळ येथे धाड टाकली. यामध्ये 7 लाख 72 हजार 800 रुपयांची रोख रक्कम आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील  निहार वारणकर या आरोपीवर गुन्हा दाखल केला गेला आहे. शनिवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, जिल्हा अधीक्षक बी. एच. तडवी, उपअधीक्षक वैद्य या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. 

अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी लोटे या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लक्ष ठेवून छापा टाकण्यात आला होता. ही मोहिम अतिशय गुप्तपद्धतीने राबविण्यात आली आहे. या घटने दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मौजे लोटे, माळ म्हसोबावाडी येथे राहणाऱ्या निहार हेमंत वारणकर याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. तेव्हा अवैध गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा एका बंद खोलीत सापडला. या कारवाईमध्ये 7 लाख 72 हजार 800 रुपयांची रोखरक्कम आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

Union Budget 2021: गोवा मुक्तीदिन हिरक महोत्सवासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद -

संबंधित बातम्या