राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; मनसेने दिला राज्य पेटवण्याचा इशारा

राज्य तसंच केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं
Raj Thackeray
Raj Thackeray Dainik Gomantak

मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने घेतलेली भूमिका सध्या राज्यात चांगलाच वादाचा विषय ठरला आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड केली आहे. या सगळ्या गोंधळातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमक्या देणारं पत्रही आपल्याकडे आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. याच पत्रासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सुपूर्द केलं. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. (raj thackeray bala nandgaonkar maharashtra death threat from letter)

Raj Thackeray
आमच्यातच मतभेद अस म्हणत शरद पवारांनी केलं मोठं विधान

धमकीचं हे पत्र हिंदीतून लिहिलेलं आहे. या पत्रात काही उर्दू शब्दही वापरण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी बोललो आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील, असंही नांदगावकर म्हणाले आहे. राज्य तसंच केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पत्रात नेमकं काय?

अजान संदर्भात तुम्ही सुरू केलेलं आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला तर जीवानिशी मारूच पण तुमच्या राज ठाकरेंचाही जीव घेऊ, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. पत्र हिंदी भाषेत असून यात काही ऊर्दू ओळींचाही समावेश असल्याचं नांदगावकर म्हणाले. पत्र राज्य सरकारकडे सुपूर्द केलं आहे. आता ते त्याची चौकशी करतील अशी आशा आम्हाला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशीही मागणी यावेळी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com