राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाची 'गर्जना', अमित ठाकरेंच्या मुलाचं झालं बारसं

ठाकरे यांच्या घरी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.
राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाची 'गर्जना', अमित ठाकरेंच्या मुलाचं झालं बारसं
Raj ThackerayDainik Gomantak

Raj Thackeray Grandson : महाराष्ट्राचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली बोरुडे (Mitali Borude) यांना नुकतंच एक गोंडस बाळ झालं आहे. ठाकरे यांच्या घरी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं 'किआन' (Kiaan) ठेवण्यात आलं आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray: बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाकडून राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

नुकताच या चिमुकल्याचा आज राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा पार पडला. वाढत्या कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेता या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होत. या नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करतं माध्यमांना दिली होती.

नावाचा अर्थ तरी काय?

'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God) असा होतो. प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा वारसा या नावाला आहे. या नावाची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असणार यावरून अनेक चर्चा राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा आणि पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आज अखेरीस अमित ठाकरेंच्या मुलाचं बारसं झालं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.