राज ठाकरेंनी औरंगाबादचीचं का निवड केली? ''34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनीही...'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रविवारी औरंगाबादेत सभा होणार आहे.
राज ठाकरेंनी औरंगाबादचीचं का निवड केली? ''34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनीही...'
Raj Thackeray Dainik Gomantak

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबादेत सभा होणार आहे. राज्यातील मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या मुद्द्यामुळे आता या रॅलीचे ठिकाणही चर्चेचा विषय बनले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सुमारे तीन दशकांपूर्वी झालेल्या मेळाव्याची झलक पाहायला मिळते. (Raj Thackeray Rally In Aurangabad Maharashtra Navnirman Sena loudspeakers controversy)

दरम्यान, 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत एक जाहीर सभेला संबोधित केले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यांनीही हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला होता. त्यांनी जनतेतून खान (Muslim) आणि बान (Shiv Sena symbol) निवडण्याची घोषणा केली होती. 1980 च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मुंबई, ठाण्यात बळकट झाली होती. त्याचवेळी मराठवाड्यात पाय रोवण्यास औरंगाबादच्या मेळाव्याची मोठी मदत झाली होती. औरंगाबादच्या (Aurangabad) सभेने शिवसेनेला (Shiv Sena) हिंदुत्वाचे राजकारण मुंबईबाहेर घेऊन जाण्यास मदत झाली होती. आता तब्बल 34 वर्षांनंतर मनसेनेही हे शहर आणि मैदान निवडले आहे.

Raj Thackeray
संजय राऊतांनी मुख्यमंत्री योगींचे केले कौतुक, राज ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

तसेच, मनसे सरचिटणीस आणि राज यांची चुलत बहीण शालिनी ठाकरे म्हणाल्या, “मनसे आपल्या राजकारणावर आणि अजेंड्यावर काम करत आहे. आम्ही कोणत्याही पक्ष किंवा नेत्याप्रमाणे वागत नाही. गेल्या काही महिन्यांत झालेल्या आमच्या अंतर्गत बैठकांमध्ये मनसेने केवळ मुंबईपुरतेच सभा मर्यादित राहू नये, असं ठरंल आहे. राज्यात रॅली आयोजित करुन, आम्ही केवळ इतर शहरे आणि प्रदेशांमधील आमच्या कार्यकर्त्यांपर्यंतच पोहोचणार नाही, तर लोकांच्या मोठ्या वर्गापर्यंतही पोहोचू.''

विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये मुस्लिम समाज 30 ते 35 टक्के आहे. इथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. जलील यांनी ठाकरे यांना इफ्तारचे निमंत्रणही दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.