Breaking: राज्यकर्तेच ईडीचा खेळ खेळत आहेत, राज ठाकरेंचा घणाघात

तीन तीन खासदारांचा प्रभाग तुम्ही करणार आहात का?
Raj Thackeray
Raj ThackerayDainik Gomantak

तीन, दोन, आणि एक प्रभाग रचना देशात सध्या कोठेही नाही, मात्र महाराष्ट्रात ही कुठुन आणि का सुरु झाली? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपस्थित केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे सध्या तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे म्हणाले, ''आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी ठाकरे सरकारे नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन, आणि एक सदस्यीयव्यवस्था असेल अशी घोषणाही केली आहे. त्यावर राज्यात विरोधात असलेल्या भाजपकडून आक्षेप घेतला जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असून तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर हल्लाबोल केला अशी कोणत्याही प्रकारची पध्दत देशात सध्या तरी अस्तित्वात नसताना मात्र महाराष्ट्रात हे कुठुन आणि का सुरु झाली, याचे एकमेक कारण राज्यात सत्ता काबीज करणे आहे,''

Raj Thackeray
मुंबई विमानतळावर 25 कोटी रुपयांची हेरॉईन जप्त,कस्टम विभागाची कारवाई

दरम्यान, तीन तीन खासदारांचा प्रभाग तुम्ही तयार करणार आहात का? लोकांनी निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची तक्रार केली पाहिजे. सत्ता काबीज करणे हाच सत्ताधाऱ्यांचा केवळ हा हेतू आहे. तसेच प्रभागपध्दतीचा खेळ केवळ सत्ताधाऱ्यांच्या मांदीयाळीसाठी तयार करण्यात आला आहे.

शिवाय, राजकीय पक्षांच्या आगोदर लोकांनीच निवडणूक आयोगाकडे जावे. महानगरपालिका निवडणूकीची केवळ सत्ताधाऱ्यांनी थट्टा चालवली आहे. आमदार आणि खासदार वेगवेगळे प्रभाग निर्माण करणार आहेत. मुंबई नाशिक दरम्यान हायवेवर भरपूर स्पीडब्रेकर आहेत. गृहमंत्री इडीकडे जात नाहीत. मला वाटतं गृहमंत्री इडीला वेडं समजत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com