मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावरून राज ठाकरेंचा घणाघात 

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमूळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमूळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात चौकशी, राजीनामे हे सत्र सुरूच असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आता या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरण हे अत्यंत चिंताजनक असून, यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच अन्यथा लोकांचा सरकार आणि पोलीस यंत्रणेवरील विश्वास उडून जाईल, असे मत देखील राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. (Raj Thackerays strong criticism of the government over the Mansukh Hiren and Sachin Waze cases)

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर कोण आणि का बाँम्ब ठेवतो? हा प्रश्न उपस्थित करत, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मनसुख हिरेन प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचे पत्र लिहिणे ही गोष्ट धक्कादायक असून, असे इतिहासात प्रथमच घडते असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाय, या घटनेमुळे महाराष्ट्राला काळिमा फासली गेली आहे व त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यानंतर, जर अनिल देशमुख हे राजनीमा देत नसतील तर त्यांचा राजीनामा लवकरात लवकर घेतला गेला पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकार कडे केली आहे. 

परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर शरद पवार यांनी बोलावली तातडीची बैठक 

याशिवाय, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सध्या चालू असलेल्या घडामोडीनंतर केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालण्याचे म्हटले आहे. व मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांचा सहभाग असणे ही गंभीर बाब असून, त्यांच्या मागचा कर्ता-करविता कोण याचा शोध घेतला जाणे गरजेचे असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुकेश अंबानींच्या घरा बाहेर गाडी कोणी ठेवली याचा तपास देखील केंद्र सरकारने करावा अशी मागणी त्यांनी पुढे आज पत्रकार परिषदेत केली आहे. 

यानंतर, (Raj Thackerays strong criticism of the government over the Mansukh Hiren and Sachin Waze cases) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे सोडून, त्यांची बदली करण्याचे कारण देखील आपल्याला समजले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्वच प्रकरणी राज्य सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांची कसून चौकशी केली करावी, असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुद्धा या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे असे मत राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, ते पत्र आता लेटर बॉम्ब ठरत आहे. या पत्रात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले असल्याचा खुलासा या पत्रात केला आहे. तर, परमबीर सिंग यांच्या आरोपावर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उत्तर देताना, अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचा थेट संबंध येत असल्याचे म्हटले आहे. तसेच परमबीर सिंग यांना याचे कनेक्शन आपल्यापर्यंत पोहचतील अशी भीती वाटत असल्यामुळेच त्यांनी आपल्यावर आरोप केले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.  

संबंधित बातम्या