राम कदमांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीला सोडवण्यासाठी केला पोलिसांनाच फोन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलिसांनाच फोन केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात युवासेना आंदोलन करणार आहे.

मुंबई :  पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलिसांनाच फोन केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात युवासेना आंदोलन करणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता  ही आंदोलने करण्यात येणार आहे.

मुंबईच्या पवई पोलीस स्टेशनचे पोलिस नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी काल दुपारी मारहाण केली या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही वेळातच आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. हे काळातच शिवसेनेने राम कदम यांचा टिकेचा धनी बनवलं. चेतना कॉलेज, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक घाटकोपर पश्चिम स्टेशन रोड, वरळी नाका, दादरमधील शिवसेना भवन, कांदिवली पूर्वेतील शिवसेना शाखा याठकाणी ही आंदोलनं होणार आहेत.

 

संबंधित बातम्या