नाव न घेता राणेंनी लगावला माहाविकास आघाडीला टोला

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

 “समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये” अशी टिका निलेश राणें यांनी केली आहे.

मुंबई: महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी  म्हणून उभे आहोत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. वडेट्टीवार यांच्या याच वक्तव्यावर  समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये” अशी टिका निलेश राणें यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारातील मंत्री जिरवायची भाषा करतो हे बरोबर नाही, असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसारच  कुठल्या समाजाला काय मिळेल ते ठरेल. तेव्हा कुठल्याही मंत्र्याने विचार करून बोललं पाहिजे, अशा आशयाचे ट्विट राणे यांनी केले आहे.

94 वे मराठी  साहित्य संमेलन : अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर -

दरम्यान, मी जिथे संधी मिळेल तिथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार आहे. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा असल्याचेही वडेट्टीवारांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या