रत्नागिरीच्या कलाकाराचा सर्वात लहान रांगोळी साकारत अनोखा विश्वविक्रम

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

विलासने 2 सेंटीमीटर इतक्या लहान चौकोनात शिवप्रतिमा साकारत हा विक्रम केला आहे.

साखरपा : मुळचे चिपळूणचे असलेले आणि शिक्षणानिमित्त देवरुखमध्ये स्थायिक झालेले रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सगळ्यात लहान रांगोळी काढून अनोख्या विक्रमास गवसणी घातली आहे. विलासने 2 सेंटीमीटर इतक्या लहान चौकोनात शिवप्रतिमा साकारत हा विक्रम केला आहे. विलास रहाटे हे प्रसिद्ध व्यक्तीचित्रात्मक रांगोळी कलाकार आहेत. आजतागायत अशा अनेक व्यक्तीरेखा त्यांनी आजपर्यंत रेखाटल्या आहेत. त्यांनी 42 मिनिटे आणि 37 सेकंदात केवळ 6 ग्रॅम रांगोळी वापरून शिवरायांची प्रतिमा साकारत सगळ्यात लहान रांगोळीचा विश्वविक्रम केला आहे. आपलाच आधी केलेला 5 सेंटीमीटर रांगोळीचा विक्रम त्यांनी यावेळी मोडला आहे.

रत्नागिरीतील बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी धडक मोहिम सुरू

वर्षभर मेहनत घेत, लॉक डाऊनच्या काळाचा उपयोग सरावासाठी केला यामुळे या विक्रमामुळे स्वप्न साकार झाले असल्याचे विलास रहाटे यांनी सांगितले. भविष्यात हाही विक्रम मोडण्याचा त्यांचा मानस आहे. विलास रहाटे यांच्या रांगोळी विक्रमाची नोंद आए इ ए बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली असून, त्यांच्या विक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. विलास रहाटे यांचा लवकरच इ ए बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्राने गौरव करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार फक्त सहा तासांत

तरंगणारी तसेच पाच रुपयांच्या नाण्याच्या आकारातील रांगोळी काढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. या विक्रमासठी निरीक्षक म्हणून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, आठल्ये पित्रे सप्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेंद्र तेंडोलकर आणि कलाशिक्षक विष्णु परीट यांनी काम बघितलं.

 

 

संबंधित बातम्या