मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर अत्याचार करून केले भयंकर कृत्य!

अमानुषपणे या महिलेचा छळ करण्यात आला
मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर अत्याचार करून केले भयंकर कृत्य!
Rape on women in Sakinaka MumbaiDainik Gomantak

मुंबई: देशातील असो वा राज्यातील महिलावरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अचूनही कायमच आहे. हे अत्याचर बलात्कार काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुण्यातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच आज सकाळी मुंबई मध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने पुन्हा समाजात खळबळ उडाली आहे.

मुंबईमधील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर आज सकाळी बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिलेच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखमी केल्याची भयंकर माहिती समोर आली आहे. अमानुषपणे या महिलेवर छळ करून असे जिवघेणे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. मोहन चव्हाण (वय वर्ष 40) असे या आरोपीचे नाव आहे.

Rape on women in Sakinaka Mumbai
'केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात आमचाच बळी': प्रताप सरनाईक

या घटनेदरम्यान, महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने महिलेवर अत्याचार केल्यानंतर तीच्या गुप्तागांत रॉडसारखी वस्तू वापरून त्या महिलेला गंभीर जखमी केले. त्यामुळे आता या महिलेची प्रकृती नाजूक असून तिला तातडीने शासकिय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस घेत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com